एका चेंडूत किती धावा होऊ शकतात? जास्तीत जास्त 6 धावा किंवा चेंडू नो बॉल असेल तर 10 किंवा 12 धावा. मात्र तामिळनाडू प्रीमियर लीगमध्ये इतिहास रचला गेला आहे. या लीगमध्ये एका चेंडूत 18 धावा झाल्या. आता तुम्ही विचार करत असाल की हे काय आहे? हे खरं आहे. खरंतर सालेम स्पार्टन्स आणि चेपॉक सुपर गिलीज यांच्यात सामना सुरू होता. या सामन्याच्या पहिल्या डावातील शेवटच्या चेंडूवर 18 धावा झाल्या. या सामन्यात सालेम स्पार्टन्स संघ प्रथम गोलंदाजी करत होता. चेपॉक सुपर गिलीज संघाने 19 षटकांत 5 गडी गमावून 191 धावा केल्या. यानंतर सालेमकडून संघाचा कर्णधार अभिषेक तन्वर डावातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आला.
पहा व्हिडिओ
The most expensive delivery ever? 1 Ball 18 runs#TNPLonFanCode pic.twitter.com/U95WNslHav
— FanCode (@FanCode) June 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)