शिवराज राक्षेने (Shivraj Rakshe) महेंद्र गायकवाडला (Mahendra Gaikwad) अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला. महेंद्र गायकवाड यावेळी माती विभागातून आला होता, तर शिरवाज राक्षे हा गादी विभागातून या अंतिम फेरीत पोहोचला होता. महाराष्ट्र केसरी (Maharashtra kesari) कुस्ती स्पर्धेची अंतिम फेरी यावेळी दमदार झाली. पण त्यानंतर शिवराजने महेंद्रला चीतपट केले आणि महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. यानंतर शिवराजवर दिग्गज नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
पहा ट्विट
पुणे जिल्ह्यातील पैलवान शिवराज राक्षे याने अतिशय थरारक लढतीत चीतपट कुस्ती करून यंदाचा महाराष्ट्र केसरी किताब पटकवला . सामान्य शेतकरी कुटूंबातून आलेल्या शिवराजचे मनपूर्वक अभिनंदन!#महाराष्ट्र_केसरी pic.twitter.com/v46nuwpRmI
— Sharad Pawar (@PawarSpeaks) January 14, 2023
शेतकरीपुत्र असलेल्या पै.शिवराज राक्षे याने यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या विजेतेपदावर नाव कोरले. समोर भरभक्कम आवाहन असतानाही नेत्रदीपक कामगिरी करत शिवराजने हा विजय खेचून आणला आहे. महाराष्ट्र केसरी पै.शिवराज राक्षे याचे मनापासून अभिनंदन! pic.twitter.com/jh0Cq1nfjP
— Ravikant Tupkar (@Ravikanttupkar1) January 14, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)