Ind vs Pak: भारतीय लोकांची क्रिकेटची क्रेझ कोणापासून लपलेली नाही. बॉलिवूड स्टार्सही या खेळाचे मोठे चाहते आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना सुरू असताना आयुष्मान खुरानाने आपल्या ट्विटमध्ये सामन्यादरम्यान एक खास किस्सा सांगितला आहे. सामन्यातील शेवटच्या दोन षटकं पाहता यावी म्हणून विमानचं उड्डाण पाच मिनिटं उशीराने झाल्याचं अभिनेत्याने सांगितलं आहे.
या ट्विटमध्ये आयुष्मान खुरानाने म्हटलं आहे की, 'ही गोष्ट माझ्या पुढल्या पिढ्यांना मला सांगता येईल. मी भारत पाकिस्तान सामन्यातील शेवटची दोन षटकं मुंबई-चंदीगढ विमानामध्ये पाहिली. विमानाचे उड्डाण होण्याच्या काही मिनिटं आधी इतर प्रवाशीही त्यांच्या स्मार्टफोनला चिटकून असताना मी ही अशाच पद्धतीने शेवटची दोन षटकं पाहिली. मला विश्वास आहे की क्रिकेटचा चाहता असलेल्या वैमानिकाने मुद्दाम पाच मिनिटं उशीर केला. आणि विशेष म्हणजे कोणीही याबद्दल तक्रार केली नाही.'
This story is for my future generations. I watched the final two overs inside the Mumbai-Chandigarh flight just before taking off with the passengers glued to their cell phones. I’m sure the cricket fanatic pilot delayed it deliberately by 5 mins, and nobody was complaining. 1/2
— Ayushmann Khurrana (@ayushmannk) October 23, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)