Strong Storm Video: सध्याच्या सोशल मिडियाच्या जमान्यात कोणता व्हिडिओ कधी, कसा, कोणत्या दाव्याने व्हायरल होईल सांगता येत नाही. आजकाल खोटे व्हिडिओ, बातम्या यामध्ये प्रचंड वाढ झाल्याचे दिसत आहे. आता एका एक्स वापरकर्त्याने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये जोरदार वादळ आल्याचे दिसत आहे. हे वादळ इतके जोरात सुरु आहे की, त्यामुळे रस्त्यावरील लोक चक्क हवेत उडताना दिसत आहेत. साधारण 37-सेकंदाच्या या व्हिडिओ क्लिपमध्ये वादळाने पादचारी फेकले जात असल्याचे दिसत आहे. ज्या युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे, त्याने दावा केला आहे की तो पाकिस्तानच्या कराचीमधील आहे. अनेकांनी सत्यता न तपासता तो कराचीचा असल्याचे सांगत पुढे पाठवला आहे. मात्र ही व्हायरल क्लिप खोट्या दाव्यासह शेअर केली जात आहे.

या वापरकर्त्याने शेअर केलेला हा व्हिडिओ सहा वर्षे जुना असून तो कराची नाही तर, हाँगकाँगचा आहे. हाँगकाँगमध्ये चित्रित करण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनेक लोक वादळामुळे उभे राहण्यास आणि चालण्यास धडपडत असल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ टायफून मंगखुट असून, ते एक शक्तिशाली आणि विनाशकारी चक्रीवादळ होते, ज्याने सप्टेंबर 2018 मध्ये बरेच नुकसान केले होते. (हेही वाचा: Saharanpur: उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील घटना,वर्षभरापूर्वी बनवलेला रस्ता 20 फूट खचला, खड्ड्यात पडून नगरसेवकासह 6 जण जखमी)

पहा व्हिडिओ-

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)