Fact Check: क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) शी संबंधित एक दावा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर व्हायरल होत आहे. महेंद्रसिंग धोनी असे लिहिलेल्या फोटोमध्ये 7 रुपयांचे नाणे दिसत आहे. @RanjanSinghG नावाच्या एका वापरकर्त्याने दावा केला आहे की, 'RBI महेंद्रसिंग धोनीच्या सन्मानार्थ 7 रुपयांचे नवीन नाणे जारी करणार आहे.' मात्र, भारत सरकारची प्रेस एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो किंवा पीआयबीने या व्हायरल मेसेजचे सत्य उघड केले आहे. पीआयबीने आपल्या फॅक्ट चेकमध्ये खुलासा केला आहे की, 'सोशल मीडियावर एक फोटो प्रसारित करण्यात येत आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनीच्या क्रिकेट क्षेत्रातीत योगदानाबद्दल 7 रुपयांचे नवीन नाणे जारी केले जात आहे, असं म्हटलं आहे. मात्र, या चित्रात केलेला दावा खोटा आहे. आर्थिक व्यवहार विभागाने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही, असं पीबीआयने स्पष्ट केलं आहे.

आरबीआय धोनीच्या सन्मानार्थ 7 रुपयांचे नाणे जारी करणार? 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)