Selfie With Leopard: सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरूण बिबट्यासमोर उभा आहे आणि तो त्या बिबट्यासबोत सेल्फी काढत आहे. अनेकांना तो तरूण प्राणीसंग्रहालय किंवा वन्यजीव उद्यानात उभा राहून फोटो काढत असल्यासारख वाटत असेल. मात्र, तो तरूण आणि बिबट्या चक्क एका शेतात आहेत. बिबट्याच्या एकंदरीत हलचालींवरून तो बिबट्या माणसाळलेला असल्याचं जाणवत आहे. कारण, तो तरूण एकटा असूनही बिबट्या त्याच्यावर हल्ला करत नाहीये. त्याउलट तो शांत बसलेला दिसत आहे. (हेही वाचा:Bengaluru Bull Attack Video: बैलाच्या हल्ल्यात दुचाकीस्वार मरतामरता वाचला; बंगळुरूमधील घटनेचा व्हिडीओ व्हायरल (Watch Video) )
View this post on Instagram
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)