पिंपरी चिंचवड मध्ये मॉर्निंग वॉकला निघालेला एक व्यक्ती चिखलात रूतल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतामधून वाट काढताना ही व्यक्ती घसरून पडली. उठण्याचा प्रयत्न करता त्याचा पाय अधिक रूतला. दरम्यान यावेळी त्याच्या मदतीला एक स्वच्छता कर्मचारी धावून आला. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आणि नंतर त्याची सुटका करण्यात आली. शिडी आणि काठीच्या मदतीने त्याला चिखलातून बाहेर काढण्यात यश आले.

पहा ट्वीट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)