Gang War Erupts Outside Surat's Bharat Cancer Hospital: सुरतच्या भारत कॅन्सर हॉस्पिटल (Bharat Cancer Hospital) च्या बाहेर टोळीयुद्धाचा (Gang War) प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. व्हिडिओमध्ये दोन तरुण रस्त्यावर उभे असताना एक कार तेथे येते आणि त्यातून दोन तीन जण बाहेर येतात. गाडीतून आलेले आणि रस्त्यावर उभे असलेल्या तरुण जोरदार मारहाण करताना दिसत आहेत. याशिवाय यातील एकजण देशी बनावटीच्या रिव्हॉल्व्हरने सशस्त्र आहे. ते कारमधून बाहेर पडलेल्या गटावर अचानक हल्ला करतात, ज्यांच्याकडे लाठ्या आणि तलवारी देखील दिसत आहेत. गजबजलेल्या रस्त्यावरील दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे गोंधळ उडाला. काही वेळानंतर या फुटेजमध्ये टोळीचे सदस्य घटनास्थळावरून पसार होताना दिसत आहेत.

पहा व्हिडिओ -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)