हिमाचलच्या धर्मशाळेत मान्सूनचे भीषण रूप पाहायला मिळाले.भागसू या पर्यटन क्षेत्रात सोमवारी सकाळी ढगफुटीमुळे जोरदार पूर आला. बघता बघता एका लहान नाल्याने नदीचे रूप धारण केले. पुरामुळे भागसू नाले ओसंडून वाहायला लागले. या नाल्याच्या वाढत्या प्रवाहात कित्येक वाहने प्रवाहात वाहून गेली.या नाल्याच्या कडेला दोन्ही बाजूला अनेक हॉटेल्स आहेत. त्या होटल्सचेही बरेच नुकसान झाले आहे .स्थानिक लोक ही घाबरले आहेत.

भागसू चा हा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येते की पाण्याचा जोरदार प्रवाह कसा गाड्यांना घेऊन जात आहेत.

 

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)