First-Ever YouTube Video: लोकप्रिय व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) आता आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो. कोट्यवधी लोक स्वतःच्या मनोरंजनासाठी दररोज या व्यासपिठाचा वापर करतात. करमणुकीव्यतिरिक्त, यूट्यूब हे कंटेंट क्रिएटर्ससाठी उत्पन्नाचा एक मोठा स्रोत आहे. तर आजच्या दिवशी 19 वर्षांपूर्वी यूट्यूबवर पहिला व्हिडिओ अपलोड केला गेला होता. 23 एप्रिल 2005 रोजी हा पहिला व्हिडिओ 26 वर्षांच्या जावेद करीम नावाच्या तरुणाने अपलोड केला होता.

हा पहिला व्हिडिओ 'मी ॲट द झु' या नावाने यूट्यूबवर पोस्ट करण्यात आला होता. हा व्हिडिओ 23 एप्रिल 2005 रोजी रात्री 8:27 वाजता अपलोड करण्यात आला होता. साधारण 18 सेकंदाच्या या क्लिपमध्ये सह-संस्थापक जावेद करीम सॅन दिएगो प्राणीसंग्रहालयात उभा असलेला दिसत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 282 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यूट्यूब हे 14 फेब्रुवारी 2005 ला लाँच करण्यात आले होते. हळूहळू हे व्यासपीठ इतके लोकप्रिय झाले की लोक त्याचा वापर करून मोठी कमाई करू लागले. सध्या T-Series हे जगातील सर्वाधिक सबस्क्राइब केलेले यूट्यूब चॅनल आहे. (हेही वाचा: Most Asked Questions On Google: इंटरनेटवर सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न कोणते? घ्या जाणून)

पहा व्हिडिओ- 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)