17 Married Couple For Police Exam: यूपी पोलिसांच्या कॉन्स्टेबल भरती परीक्षेबाबत तरुणांमध्ये प्रचंड उत्साह होता. परीक्षा केंद्रांवर उमेदवारांची मोठी गर्दी झाली होती. बिजनौर जिल्ह्यात झालेल्या पोलिस परीक्षेत अशा 17 जोडप्यांनीही सहभाग घेतला ज्यांचा  प्रथम विवाह सोहळा पार पाडला आणि त्यानंतर लगेचच परीक्षा देण्यासाठी आपापल्या परीक्षा केंद्रांवर पोहोचले. या जोडप्यांचे लग्नही परिसरात चर्चेचा विषय बनला होता. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी कॉन्स्टेबल भरती परीक्षा घेण्यात आली होती. बिजनौरमध्येही मोठ्या संख्येने उमेदवार दाखल झाले होते. त्यांच्यापैकी अनेक जणांचा सामूहिक विवाह योजनेत काही तासांपूर्वीच विवाह झाला होता. म्हणजेच काही तासांपूर्वीच त्यांचे लग्न झाले आणि त्यानंतर लगेचच ते परीक्षा देण्यासाठी केंद्रावर पोहोचले. लोक जिद्दीचे कौतुक करत आहेत.

पाहा व्हिडीओ: 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)