नुकतेच सांगली येथे महिलांची महाराष्ट्र केसरी (Women Maharashtra Kesari) स्पर्धा पार पडली. महाराष्ट्राच्या कुस्तीच्या इतिहासात प्रथमच अशी महिलांची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत प्रतीक्षा बागडी हिने अंतिम लढत जिंकून पहिली महिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान प्राप्त केला आहे. प्रतीक्षा बागडी आणि वैष्णवी पाटील या दोघींमध्ये अंतिम लढत झाली. सांगलीच्या तुंग गावची असलेली प्रतीक्षा बागडी ही 21 वर्षांची असून ती वसंत कुस्ती केंद्र सांगली इथे सराव करते.
दिनांक 23 व 24 मार्च रोजी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेसाठी राज्यभरातून 45 संघांतून सुमारे 400 ते 450 स्पर्धक सहभागी झाले होते.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)