हळू हळू आता बाजारात आंब्यांची आवक सुरु झाली आहे. मात्र दरवर्षी देवगड हापूस आंब्यांच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक होते. सर्वसामान्य लोकांना खरा हापसू ओळखता येत नाही. मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे. प्रत्येक देवगड आंब्यावर TP seal UID कोड लावण्यात आला आहे, ज्यावरून खरा देवगड ओळखत येणार आहे. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने जीआय नोंदणीकृत शेतकऱ्यांना त्यांच्याकडील झाडांची संख्या व त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार TP Seal UID वितरित केले आहेत. त्यामुळे आता प्रत्येक अस्सल देवगड हापूस आंब्यावर हा खास युनिक स्टिकर लावणे बंधनकारक असेल. यामुळे असे युआयडी असलेले आंबेच 'देवगड हापूस' किंवा 'देवगड अल्फोन्सो' म्हणून बाजारात विक्री केले जाणार आहेत.

या उपक्रमाचे उद्दिष्ट देवगड अल्फोन्सो (हापूस) म्हणून विक्री केल्या जाणाऱ्या बनावट/नकली आंब्यांची विक्री थांबवणे आणि ग्राहकांना देवगडमधील अस्सल आंबे मिळतील याची खात्री करणे हे आहे. सोसायटीचे बोर्ड सदस्य अॅड. ओंकार एम. सप्रे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात पिकणारा देवगड अल्फोन्सो आंबा गेल्या शतकाहून अधिक काळापासून स्वतःचे नाव निर्माण करत आहे. तो त्याच्या अनोख्या सुगंध आणि चवीसाठी बाजारात लोकप्रिय आहे. मात्र, आज देवगड हापूस म्हणून विकले जाणारे 80% पेक्षा जास्त आंबे प्रत्यक्षात देवगडचे नाहीत. गेल्या तीन दशकांपासून, इतर प्रदेशात पिकवले जाणारे निकृष्ट आंबे देवगड हापूसच्या नावाने उघडपणे आणि नियमितपणे विकले जात आहेत. यामुळे देवगड शेतकऱ्यांना त्यांचा योग्य बाजारपेठेतील वाटा हिरावून घेतला जात आहे, ज्यामुळे गंभीर सामाजिक आणि आर्थिक समस्या निर्माण होत आहेत. म्हणूनच, आता आंब्यांवर युआयडी स्तरीकर लावले जाणार आहे. (हेही वाचा: FASTag Mandatory: फास्टटॅग नसल्यास 1 एप्रिलपासून दुप्पट भरावा लागणार टोल; पहा कसा बनवायचा फास्टटॅग ऑनलाईन, ऑफलाईन)

UID Code on Devgad Hapus Mango:

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)