आपला विरोध व्यक्तीला नाही तर वृत्तीला आहे. त्यामुळे आपल्या विरोध हा पंतप्रधान नरेंद्र मोदी या व्यक्तीस नाही. तर देशातील हुकुमशाही प्रवृत्ती आणि भाजपच्या धोरणांना आहे, असे स्पष्ट विधान उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी शरद पवार आणि इतरही अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. कोणी काहीही म्हटलं तरी महाविकासआघाडीला धक्का लागेल अशा प्रकारचे विधान आपल्याकडून तरी आपण होऊ देणार नसल्याचे, उद्धव ठाकरे या वेळी म्हणाले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)