Uddhav Thackeray Meets Sharad Pawar: महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्यावरून विरोधी महाविकास आघाडी यांच्यातील मतभेदाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांनी सोमवारी मुंबईत राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. ठाकरे यांनी दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक येथील माजी केंद्रीय मंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची तासभर भेट घेतली, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. विरोधी आघाडीचे शिल्पकार पवार, एमव्हीएमधील अशांतता शांत करण्यासाठी पुढे आले असल्याचे दिसत आहे. आजच्या बैठकीवेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरेही उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले.
याआधी पवार सांगितले होते की, केंद्रातील इंडिया युती आणि महाराष्ट्रातील महाविकास आघाडी हे केवळ राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर निवडणुका लढवण्यासाठी एकत्र आले होते. स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या बाबत चर्चा नव्हती. दुसरीकडे, एबीपी माझाच्या वृत्तानुसार, या बैठकीत दोन्ही नेत्यांनी महाविकास आघाडीच्या भविष्यातील रणनीतीवर चर्चा केली. तसेच सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी 25 जानेवारी रोजी मुंबईत जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, त्याबाबतही चर्चा झाली.
Uddhav Thackeray Meets Sharad Pawar-
Mumbai, Maharashtra: Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray left the residence of NCP-SCP chief Sharad Pawar at Silver Oak (NCP-SCP Chief Sharad Pawar's residence) pic.twitter.com/R9vkiuJuXD
— IANS (@ians_india) January 20, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)