२२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी (Sony Marathi) वाहिनीवर ‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) सुरू होणार आहे. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा स्वानंदी टिकेकर (Swanandi Tikekar) सांभाळणार आहे. सोनी मराठी वाहिनीवरील ‘सिंगिंग स्टार’ या कथाबाह्य कार्यक्रमाची ती विजेती आहे. अभिनय, गाणं यांबरोबरच आता निवेदनाची जबाबदारीही तिने स्वीकारली आहे. अजय-अतुल (Ajay-Atul) हे या कार्यक्रमाचे परीक्षक आहेत. अभिमान देशाचा, आवाज महाराष्ट्राचा हे ब्रीदवाक्य असलेला हा कार्यक्रम येत्या २२ नोव्हेंबरपासून सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘इंडियन आयडल मराठी’ हा कार्यक्रम रसिक प्रेक्षकांसाठी सुरांची पर्वणी असणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Swanandi 🌸 (@swananditikekar)

 

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)