Nashik Bus Accident: नाशिक जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक-सिन्नर महामार्गावर भीषण अपघात (Accident) घडला आहे. शिंदे पळसे टोल नाक्यावर तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला असून यात 3 जणांचा मृत्यू झाल्यांची प्राथमिक माहिती आहे. एसटी बसने तीन ते चार दुचाकीस्वारांना चिरडत पेट घेतला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून बचावकार्य सुरू केलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे-पळसे टोल नाक्याजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात येणाऱ्या बस चालकाचं एसटी बसवरील नियंत्रण सुटलं आणि बसने समोरून येणाऱ्या तीन ते चार दुचाकींना चिरडलं. तसेच या बसने समोर असलेल्या एका एसटी बसला देखील जोरदार धडक दिली. यात तीन दुचाकीस्वारांचा मृत्यू झाला असून बसमधील काही प्रवासी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातानंतर एसटी बसने अचानक पेट घेतला. (हेही वाचा - Mumbai Airport वर येत्या हॉलिडे सीझनमध्ये गैरसोय टाळण्यासाठी विमानतळ प्रशासना कडून प्रवाशांना 'हे' कळकळीचं आवाहन)
नाशिक अपघातग्रस्त बसने घेतला पेट -
Nashik Bus Accident : मोठी बातमी! नाशिक शहरानजीक बस पेटली, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी
नाशिक पुणे महामार्गावर शिंदे पळसे टोल नाक्यावर विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती आहे. #Nashik #NashikBus Accident pic.twitter.com/DCWOruzcV3
— ABP माझा (@abpmajhatv) December 8, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)