Sharad Pawar Collar Video : सातारा मतदारसंघात नेहमी राष्ट्रवादीच वर्चस्व राहील आहे. गेल्या लोकसभा निवडणूकीत राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील विजयी झाले होते. त्याआधी उदयनराजे भोसले (udayanraje bhosale)हे राष्ट्रवादीच्या तिकीटावरून निवडूण आले होते. मात्र, आता श्रीनिवास पाटलांनी निवडणूक लढवण्यातून (Srinivas Patil) माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे साताऱ्यात नव्या उमेदवाराचा शोध घेण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. यादरम्यान, प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना शरद पवार यांनी साताऱ्यात कॉलर उडवली (Sharad Pawar Collar Video) आहे. त्यांनी कॉलर उडवून एका प्रकारे उदयनराजेंना आव्हानच दिलं आहे. (हेही वाचा :Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभेतून खासदार श्रीनिवास पाटील यांची माघार, प्रकृतीच्या कारणामुळे निवडणूक न लढवण्याचा निर्णय )

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)