दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शिक्षणाचा अधिकार (Right to Education) या उपक्रमा अंतर्गत प्रवेशप्रक्रिया 1 मार्चपासून सुरु झाले असून 17 मार्चपर्यंत पालकांना आरटीई (RTE) पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करता येईल. शाळेच्या एकुण संख्येपेक्षा 25 टक्के राखीव जागांवर आरटीई अंतर्गत दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थी प्रवेश मिळवता येतो. वंचित घटकात अनुसुचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी, व्हीजेएनटी, विशेष मागासप्रवर्ग तसेच दिव्यांग विद्यार्थांचा यामध्ये समावेश होतो. तर दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी कुटुंबांचे उत्पन्न 1 लाखांपेक्षा कमी असावे. यासोबतच रहिवासी पुरावा म्हणून रेशन कार्ड, आधार कार्ड, बँक पासबुक, गॅसचे बुक भाडेपट्टी कर पावती, विजेचे बिल पाण्याचे बिल आदीं कागदपत्रांची गरज लागेल.
पहा ट्विट
शाळेत मोफत प्रवेशासाठी अर्ज केला का? 17 मार्चपर्यंत मुदत;
ऑनलाईन पद्धतीने भरा अर्ज: रहिवास पुरावा ठरणार महत्त्वाचा#nashik #schools #free #admissionopen #Online #application pic.twitter.com/ImWNbl9kbf
— DISTRICT INFORMATION OFFICE, NASHIK (@InfoNashik) March 5, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)