गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरु आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता 12 सप्टेंबरपासून वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. पुढील 4-5 दिवस तरी मान्सून सक्रीय राहणार असल्याची माहिती मिळत आहेत. आता आज संध्याकाळपासून पुण्यात ढगफुटी सदृष्य पाऊस सुरु झाला आहे. अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत, घरांमध्ये पाणी शिरले आहे. शहरातील चंदन नगर पोलीस स्टेशनमध्ये पाणी भरले आहे. मेट्रोच्या कामामुळे ठिकठिकाणी पाणी साचण्याची शक्यता आहे.

कात्रज धनकवडी परिसरासह पर्वती भागात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे अंबिल ओढ्याला प्रचंड पूर आला आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यात घाटमाथ्यावर ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. खडकवासला धरणातून मुठा नदीला होणारा पाण्याचा विसर्ग आज रात्री 8 वाजता 2,568 क्युसेकने वाढवण्यात आला आहे. सध्याची शहरातील पूरसदृश्य परिस्थिती पाहता गरजेचे असल्याशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)