शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. संजय राऊत यांचे बिझनेस पार्टनर सुजित पाटकर यांच्याविरोधात पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. शिवाजी नगर जंबो कोविड सेंटरचे कंत्राट घेण्यासाठी फसवणुकीचा आरोप सुजित पाटकर यांच्या लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसविरोधात आयपीसी कलम 420, 406, 465, 467, 468, 471, 511, 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. भाजप नेते किरीट सोमय्यांनी याबद्दलची तक्रार दाखल केल्याचे पुणे पोलिसांनी सांगितले.

पहा ट्विट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)