पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यातील PDCC बँकेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक विभागाच्या भरारी पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आलीय. काल रात्री उशिरापर्यंत बँक चालू ठेवल्याप्रकरणी 2024 च्या आदेशानुसार आचारसंहिता भंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आमदार रोहित पवार यांनीही या बँकेच्या व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत प्रश्न उपस्थित केले होते.
पाहा पोस्ट -
#PDCC बँकेच्या वेल्हे शाखेतील #घड्याळ बहुतेक बंद पडलंय....
आत्ता रात्रीचे 12 वाजले तरी बँक सुरू आहे... कदाचित उद्या मतदानामुळे आज रात्रभर #ओव्हर_टाईम सुरू असावा...
निवडणूक आयोग दिसतंय ना?
सामान्य मतदार मात्र योग्यच निर्णय घेईल.@CEO_Maharashtra pic.twitter.com/3os8ALWv2v
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 6, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)