पुणेकरांसाठी एक दिलासादायक बाब आहे. पुणे मनपा हद्दीत कोरोनाबाधित एकही रुग्णाचा आजही मृत्यू झालेला नाही. गेल्या आठवडाभरात शून्य मृत्यू असण्याची ही चौथी वेळ आहे. याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन करत निरंतर सेवेबद्दल धन्यवाद दिले आहेत. कालच्या अपडेटनुसार पुण्यात सध्या 840 कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
लढाई जिंकतोय; पुणे शहरात आजही कोरोना मृत्यू नाही !
पुणे मनपा हद्दीत कोरोनाबाधित एकही रुग्णाचा आजही मृत्यू झालेला नाही. गेल्या आठवडाभरात शून्य मृत्यू असण्याची ही चौथी वेळ आहे. आरोग्य विभागाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि निरंतर सेवेबद्दल धन्यवादही !
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 27, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)