पुण्यात पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणात पाण्याची आवक घटलेली नाही. परिणामी रविवारी रात्रीपासून खडकवासला धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग मुठा नदीत सोडण्यात आला आहे. पुणे शहरातील पुना हॉस्पिटलच्या पुलावरून एक मुलगा मुठा नदीच्या पाण्यात पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या मुलाचं वय अंदाजे वय 12 वर्ष सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाकडून 2 पथके रवाना करण्यात आली असून शोधकार्य सुरू आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)