Pune Metro Update: जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सेवेचा उद्घाटन सोहळा आज रद्द झाल्याने बदलही मागे घेत नियमित धावणार पुणे मेट्रो
जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट ही मेट्रो ची सेवा आज सुरू होत नसल्याने सारे बदल मागे घेत पुणे मेट्रो ची सेवा आता पूर्ववत करण्यात आली आहे.
पुणे शहरामध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत असल्याने जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट मेट्रो स्टेशन दरम्यान सेवेचा उद्घाटन सोहळा रद्द झाला आहे. त्यामुळे या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर केलेले बदल मागे घेत पुणे मेट्रो नियमित चालवली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. नरेंद्र मोदींचा आजचा पुणे दौरा देखील पावसाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा सत्र न्यायालय ते स्वारगेट ही मेट्रो ची सेवा देखील कार्यान्वित नसेल असे सांगण्यात आले आहे.
पुणे मेट्रो अपडेट
#ImportantAnnouncement
Ongoing heavy rainfall in Pune has significantly affected daily life, making it difficult for citizens to attend the inauguration ceremony. As a result, the opening of the underground metro route from District Court Metro Station to … pic.twitter.com/6J0b71cJy3
— Pune Metro Rail (@metrorailpune) September 26, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

