Pune Airport New Name: पुणे विमानतळाला ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्याच्या केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रस्तावाला, महाराष्ट्र सरकारने सोमवारी मंजुरी दिली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात येणार आहे. याबाबत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर), मोहोळ यांनी भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचा समावेश असलेल्या महायुती सरकारचे आभार मानले. त्यांनी लिहिले, धन्यवाद, महायुती सरकार! धन्यवाद, मा. देवेंद्रजी!. पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नामकरण ‘जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल आज पडले असून आपण दिलेल्या प्रस्तावाला राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. सदर प्रस्ताव हा कॅबिनेट बैठकीत मंजूर करण्यात आला असून, पुढील प्रक्रियेसाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे. हा प्रस्ताव येत्या कॅबिनेटमध्येच मंजूर केला जाईल, या संदर्भातील घोषणा उपमुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी दोनच दिवसांपूर्वी पुण्यात केली होती. मा. देवेंद्रजींनी शब्द पाळत घोषणा केल्यानंतरच्या पहिल्याच कॅबिनेटमध्ये हा प्रस्ताव मंजूर केला आहे.’ (हेही वाचा: Mumbai Pune Road: मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 2 तासांनी कमी होणार; अटल सेतू 8 लेन एक्स्प्रेस वेने सोलापूर आणि साताऱ्याला जोडला जाणार)

पुणे विमानतळ ओळखले जाणार 'जगद्गुरू संत तुकाराम महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ'-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)