सोशल मीडियावरील एका पोस्टच्या माध्यमातून रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथील छताचा काही भाग निखळल्याचा दावा करण्यात येतो आहे. हा व्हिडिओ काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे पाटील यांनी आपल्या X (पूर्वीचे ट्विटर) हँडलवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा असो की, रत्नागिरी रेल्वे स्टेशन त्यांच्या भ्रष्टाचारापासून काहीही सुटले नाही, असे म्हटले आहे. त्यांचा रोख राज्य आणि केंद्र सरकारवर आहे. मात्र काँग्रेसकडून शेअर करण्यात आलेला हा व्हिडिओ फेक असल्याचे पीआयबीने म्हटले आहे. अशी कोणतीही फेक माहिती शेअर करू नका, असं आवाहन पीआयबीने केलं आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)