महाराष्ट्रातली सर्व दुकाने आणि आस्थापनांवरील पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. त्यानुसार कर्मचारी संख्या 10 पेक्षा कमी असलेल्या आणि जास्त असलेल्या सर्व आस्थापनांना नामफलक मराठीत लावणे बंधनकारक आहे. यामध्ये मराठीसोबत इतर भाषांमध्येही नामफलक लावता येईल परंतु मराठी भाषेतील नाव आधी असणे गरजेचे आहे.

आता राज्यातील सर्वच क्षेत्रातील दुकान व आस्थापनांवरील पाट्या या मराठी भाषेत आणि ठळक अक्षरात असाव्यात यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. पुढील एक महिना दुकाने आणि आस्थापनांना याबाबत सूचना देऊन त्यानंतर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)