नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी (Navi Mumbai Crime) समोर आली आहे. येथे एका व्यक्तीवर आपल्या सावत्र मुलीवर बलात्कार (Rape) केल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांनी शनिवारी सांगितले की, नवी मुंबईतील एका 28 वर्षीय व्यक्तीवर आपल्या 18 वर्षीय सावत्र मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. 22 डिसेंबर रोजी घडलेल्या या घटनेबाबत एका किशोरवयीन मुलीच्या तक्रारीनंतर कोपरखैरणे येथील रहिवाशाविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. ही घटना मुलगी घरात झोपली असताना घडली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
पाहा पोस्ट -
Navi Mumbai Shocker: 28-Year-Old Man Booked for Raping His Teen Step-Daughter#NaviMumbai #SexualAbuse #CrimeAgainstWomen https://t.co/Tmzl18kUxU
— LatestLY (@latestly) December 24, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)