Harbour Line Night Block: पनवेल स्थानकावर गाड्या रद्द होणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वेंनी दिली आहे. मुंबईतील हार्बर मार्गावरील प्रवाशांना 22 दिवस समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. जेएनपीटीपर्यंत समर्पित फ्रेट कॉरिडॉरसाठी काम सुरू आहे. त्यासाठी दोन ट्रॅकही पनवेलमधून जात आहेत. 18 ऑगस्टपासून या ट्रॅकचे काम सुरू झाले असून दररोज रात्री सुमारे 3 तासांचा ब्लॉक घेण्यात येत होता. आता पनवेल यार्डात काही कट व जोडणीचे काम केले जाणार असून, त्यामुळे ब्लॉकचा कालावधी वाढवून रात्री 5 तास करण्यात येत आहे. या ब्लॉकमुळे सीएसएमटीहून पनवेलकडे जाणारी शेवटची लोकल रात्री 10.58 वाजता असेल. त्यानंतर पनवेलच्या गाड्यांना बेलापूरलाच थांबा देण्यात येणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)