Mumbai Rains: महाराष्ट्रातून अजूनही मान्सून पूर्णपणे गेला नाही. गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि परिसरात हलक्या सरी कोसळत आहेत. हा ट्रेंड पुढील आठवडाभर कायम राहू शकतो. दक्षिण-पश्चिम मान्सूनचा हा शेवटचा टप्पा असल्याने कोकण भागात, विशेषत: मुंबईत सध्या तुरळक पाऊस पडत असून, त्यामुळे मान्सूनचा उत्साह कायम आहे. कल्याण-डोंबिवलीत सकाळपासून ढगाळ वातावरणात होते. दुपारी तीननंतर अचानक रिमझिम पावसाला सुरवात झाली. मुंबई उपनगरातील अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, मालाड, बोरीवली परिसरात रिमझिम पाऊस सुरू झाला आहे. याचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, मान्सूनचे प्रस्थान जवळ आले आहे, परंतु या आठवड्यात मान्सून पूर्णपणे परतणे शक्य नाही. नैऋत्य मान्सून साधारणपणे 06 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतून माघार घेतो. यावर्षी मान्सून परतण्याचा काळ लांबला आहे.. येत्या काही दिवसांत मुंबईसह कोकण किनारपट्टीवर आणखी काही पाऊस पडू शकतो. मात्र अहवालानुसार, येत्या 2-4 दिवसांत मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांतून मान्सून माघार घेऊ शकतो. माहितीनुसार, आजपासून पुढील 4 दिवस तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, मुंबईसह कोकण, मराठवाडा भागात ढगांच्या गडगडाटासह किरकोळ पावसची शक्यता आहे. (हेही वाचा: Asian Development Bank कडून महाराष्ट्रामध्ये Coastal and Riverbank Protection साठी $42 million चं कर्ज)

मुंबईत अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी-

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)