IND vs SL World Cup 2023 सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम वर येणार्यांसाठी आज मुंबई पोलिसांकडून खास सूचना जारी करण्यात आल्या आहेत. नागरिकांना स्वतःची वाहनं घेऊन न येता सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करण्याचं आवाहन केले आहे. दरम्यान आज श्रीलंका विरूद्ध भारत असा सामना रंगणार आहे. प्रेक्षकांना वानखेडे स्टेडियमच्या आत पिशवी, पाण्याची बाटली, धातू आणि दाहक वस्तू इत्यादी घेऊन जाऊ नका असा सल्ला देण्यात आला आहे. पोलिसांनी प्रेक्षकांना कोणतीही संशयास्पद वस्तू आढळल्यास जवळच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना कळवण्यास सांगितले आहे. Sachin Tendulkar Statue Unveiling Video: वानखेडे स्टेडियमवर सचिन तेंडुलकरच्या पुतळ्याचे अनावरण, चाहत्याकडून 'सचिन-सचिन'चा जयघोष (Watch Video).
पहा ट्वीट
Important guidelines for fans visiting Wankhede Stadium, Mumbai for Cricket World Cup Match on 2nd November.#CricketWorldCup2023#INDvsSL pic.twitter.com/LWRnchDuN1
— मुंबई पोलीस - Mumbai Police (@MumbaiPolice) November 1, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)