वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर बेकायदेशीरपणे वाहनांची स्पर्धा आयोजित करणाऱ्या 82 तरुणांना आज न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या प्रकरणात मुंबईतील वांद्रे-खोतवाडी पोलिसांनी 48 दुचाकी जप्त केल्या. मुंबई पोलीस अटक केलेल्या 82 तरुणांची पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.

पोलिसांनी आरोपींवर भारतीड दंड संहिता कलम 279,336,114, 34 कलम 125/177, 129/177, 179,184, 192(2) MV कायदा तसेच जुगार कायदा कलम 5 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, बेकायदेशीरपणे वाहन (दुचारी) स्पर्धा आयोजित करण्यासाठी आरोपींना इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे त्यांना बाइक रेसिंगसाठी आमंत्रित करण्यात आले होते. अटक केलेल्या 82 पैकी 10 अल्पवयीन आहेत आणि 40 रेसर्सनी हेल्मेट घातले नव्हते, असे पोलिसांनी सांगितले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)