Mumbai Local Updates: मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे चालवणार विशेष लोकल; पहाटे 3 वाजता पहिली लोकल
सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी कल्याण दरम्यान अप-डाऊन मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे.
मुंबईत विधानसभा निवडणूकीसाठी कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी मध्य रेल्वे उद्या (20 नोव्हेंबर) सीएसएमटी ते पनवेल आणि सीएसएमटी कल्याण दरम्यान अप-डाऊन मार्गावर विशेष ट्रेन चालवली जाणार आहे. पहाटे 3 वाजता पहिली ट्रेन धावणार आहे. दरम्यान मतदान सकाळी 7 वाजता सुरू होणार आहे. त्याआधी कर्मचार्यांना आणि मतदारांनाही आपल्या बूथ वर पोहचण्यासाठी ही सोय करण्यात आली आहे. तर निवडणूकीची सुट्टी असली तरीही रेल्वेच्या फेर्या सुरळीत चालू राहणार आहेत. नक्की वाचा: Mumbai Metro Rail Corporation कडून मतदानाच्या दिवशी सेवांच्या वेळापत्रकामध्ये बदल; पहाटे 4 वाजता पहिली गाडी.
मध्य रेल्वे कडून माहिती
#मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. @Central_Railway #Centralrailway #railways #VidhanSabhaElection2024 #MaharashtraAssemblyElections2024 #electionday2024 pic.twitter.com/Q7V6I7D0Hf
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) November 19, 2024
📢Tomorrow on Date 20.11.2024 All suburban trains will run as per the Scheduled Time Table.
(Mail Line, Harbor Line & Trans Harbor Line)@Central_Railway @YatriRailways
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) November 19, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 19, 2024 08:43 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

