मुंबई मध्ये बेस्ट बसच्या कंत्राटी कर्मचार्यांनी पगारवाढीच्या मागणीसाठी उपसलेलं बंदाचं हत्यार आता अजून 6 डेपो मध्ये पोहचलं आहे. एकूण 18 डेपो मधील कर्मचारी सध्या संपामध्ये सहभागी झाल्याने वाहतूक व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. बेस्ट बसच्या संपामुळे आज सकाळपासून एकूण 1400 बस रस्त्यावर धावू शकलेल्या नाहीत. यामध्ये अजून कोणताच तोडगा काढण्यात आलेला नसल्याने मुंबईकरांची अनेक ठिकाणी गैरसोय होत आहे. रेल्वे पाठोपाठ मुंबईकरांची सर्वाधिक पसंती बेस्ट बसने प्रवासाला आहे.
पहा ट्वीट
#BEST bus strike intensifies, drivers of wet lease buses from six more depots join the stir. With this, a total 18 depots are facing strike by contractual drivers. Over 1400 buses staying off roads since early morning #Mumbai
— TOI Mumbai (@TOIMumbai) August 4, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)