आज पहाटे मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने, शहरातील काही भागात पाणी साचले आणि जड वाहतुकीमुळे रहिवाशांची गैरसोय झाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) मुंबई आणि त्याच्या उपनगरांसाठी मध्यम ते मुसळधार पाऊस आणि पुढील काही दिवसांत वेगळ्या ठिकाणी अत्यंत जोरदार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. ठाण्यातही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान माथेरानपेक्षा मुंबईसह ठाण्यात आधिक पावसाची नोंद झाली आहे.
माथेरान पेक्षा मुंबई आणि ठाण्यात अनेक ठिकाणी अधिक पावसाची नोंद @IMDWeather #rain #rainyseason pic.twitter.com/6wOEOBAUtA
— AIR News Mumbai, आकाशवाणी मुंबई (@airnews_mumbai) July 5, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)