एनसीपी नेते नवाब मलिक यांना वैद्यकीय कारणांवर सर्वोच्च न्यायालयाकडून मनी लॉडरिंगच्या प्रकरणामध्ये जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानं नवाब मलिकांना तात्पुरता जामीन दिला होता. त्यावेळी मलिकांनी जामीन अर्जात आपल्याला किडनी, लिव्हर, हृदयाशी संबंधित अनेक शारीरिक व्याधी असल्याचं सांगितलं होतं. त्याच्या आधारे आता जामीन वाढवण्यात आला आहे. कुर्ला परिसरातील जमीन विक्रीच्या घोटाळ्यात ईडी कडून नवाब मलिकांना अटक करण्यात आली होती.
एनसीपी नेते नवाब मलिक यांना जामीन मंजूर
News Alert ! Money laundering case: SC grants bail to NCP leader Nawab Malik on medicalgrounds.
— Press Trust of India (@PTI_News) July 30, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)