सध्या महाराष्ट्रामध्ये राजकीय गदारोळ माजला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्याने महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. त्यात आता राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी सरकारला बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र दिले आहे. उद्या 30 जून रोजी ही बहुमत चाचणी घेण्याचे या पत्रात नमूद केले आहे. परंतू या बहुमत चाचणीच्या विरोधात शिवसेने कोर्टात गेली होती. ही बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी अशी शिवसेनेची मागणी होती. संपूर्ण राज्याचे लक्ष या निर्णयाकडे लागले होते. आता नुकताच सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय समोर आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने उद्याची बहुमत चाचणी स्थगित करण्यास नकार दिला आहे. म्हणजेच उद्या बहुमत चाचणी होणार आहे. महाविकास आघाडी सरकारसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. उद्या 11 ते 5 या वेळेत ही बहुमत चाचणी होणार आहे. यासह सर्वोच्च न्यायालयाने शिवसेनेचे चीफ व्हीप सुनील प्रभू यांच्या याचिकेवर नोटीस बजावली असून उद्याची, फ्लोर टेस्ट सध्याच्या याचिकेच्या निकालाच्या अधीन असेल असे म्हटले आहे. कोर्ट 11 जुलै रोजी त्याच्या याचिकेवर सुनावणी करणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)