एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर आता अखेर महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. नुकताच उद्धव ठाकरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. उद्या महाराष्ट्रात बहुमत चाचणी पार पडणार आहे. सध्या गोव्यात असलेले बंडखोर आमदार या चाचणीसाठी मुंबईमध्ये येणार आहेत. या पार्श्वभुमीवर मुंबई मोठा पोलीस बंदोबस्त असणार आहे. आमदारांचे परत येणे आणि बहुमत चाचणीच्या दृष्टीने करण्यात आलेली सुरक्षा व्यवस्था मुंबई पोलिसांनी शेअर केली आहे.

उद्या मुंबईमध्ये डीसीपी स्तरावरील आणि त्यावरील 20 अधिकारी, 45 एसीपी स्तरावरील अधिकारी, 225 पोलीस निरीक्षक, 725 एपीआय/पीएसआय, 2500 पोलीस कर्मचारी, 1250 एलपीसी कर्मचारी, एसआरपीएफच्या 10 कंपन्या आणि 750 कर्मचारी अतिरिक्त दल तैनात करण्यात आले आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)