अखेर शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा मुहुर्त ठरला. आज शिंदे-फडणवीस सरकारमधील राजभवनाच्या दरबार हॉलमध्ये मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला आहे. यात भाजपच्या 9 आमदारांनी तर शिंदे गटातील 9 आमदारांनी म्हणजेच एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यापैकी भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील, चंद्रकांत पाटील, विजयकुमार गावित, सुधीर मुनगंटीवार, गिरीष महाजन, सुरेश खाडे,रविंद्र चव्हान, अतुल सावे आणि मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे तर शिंदे गटातील दादा भुसे, संजय राठोड, गुलाबराव पाटील, संदिपान भुमरे, उदय सामंत, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, शंभूराज देसाई या आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे.
#थेटप्रसारण :-
राज्य मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा राजभवन येथे होत आहे. राज्यपाल @BSKoshyari हे नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ देत आहेत.#Live https://t.co/aG71w6YMZN
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) August 9, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)