Leopard spotted in Pune: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरातील निगडी प्राधिकरणात बिबट्या (Leopard) दिसल्याची घटना घडली. नागरिकांनी वन विभागाला याची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे (Forest Department) बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. बऱ्याच प्रयत्नांनंतर वन विभागाने बिबट्याला पकडले आहे. बिबट्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. संत कबीर गार्डनच्या टिन शेडजवळ बिबट्या लपला होता. आज सकाळी बचाव पथकाने काळजीपूर्वक बिबट्याला शांत केले आणि पिंजऱ्यात बंदिस्त केले. बिबट्याला वाचवल्यानंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. हा व्हिडिओ @ians_india ने सोशल मीडियावर शेअर केला आहे. (Leopard in Wagholi: पुण्यातील वाघोली परिसरात पुन्हा आढळला बिबट्या; रहिवाशांमध्ये सुरक्षिततेची चिंता वाढली (Watch Video)
निवासी भागातून बिबट्या जेरबंद
Pimpri, Chinchwad: A leopard was spotted in Nigdi Pradhikaran Sector 24, causing panic among residents. CCTV footage captured the leopard roaming in the area. The forest department’s rescue team has been deployed to trap the animal pic.twitter.com/w2mpD8RCxb
— IANS (@ians_india) February 2, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)