'कोण होणार करोडपती'चं नवं पर्व सध्या चर्चेत आहे. या पर्वातील नुकत्याच पार पडलेल्या एका भागात एक महिला शिक्षिका सहभागी झाली होती. दरम्यान त्या शिक्षिकेला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणत्या किल्ल्यावर झाला? असा प्रश्न विचारण्यात आला आणि प्रतापगड, शिवनेरी, सिंहगड, रायगड हे चार पर्याय देण्यात आले. पण संबंधित शिक्षिकेला या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही आणि तिने व्हिडीओ फ्रेंड या लाइफ लाइनचा वापर केला. शिक्षिका असूनही सोप्या प्रश्नाचं उत्तर देता आलं नसल्याने महिलेला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे.
पाहा व्हिडिओ -
छत्रपती शिवरायांचा राज्यभिषेक कोणत्या किल्ल्या वर झाला? MSC B.ed शिक्षिकेला आलं नाही उत्तर किती दुर्दैव... pic.twitter.com/eGir1V2HKT
— Shilpa Bodkhe - प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) August 10, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)