मराठी संगीत रंगभूमीवरील गायिका आणि अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांनी आज (22 जानेवारी) अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रूग्णालयामध्ये उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे. कलाविश्वामध्ये कीर्ती शिलेदार यांच्या निधनाच्या वृत्ताने हळहळ व्यक्त केली जात असताना राजकीय मंडळींनीदेखील आपला शोक व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोक संदेश
ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने संगीत रंगभूमीलाच आपला श्वास,ध्यास मानणारी व्रतस्थ शिलेदार काळाच्या पडद्याआड गेली आहे, अशी श्रद्धांजली मुख्यमंत्री #उद्धवठाकरे यांनी वाहिली आहे.
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) January 22, 2022
अजित पवार
ज्येष्ठ अभिनेत्री,शास्त्रीय गायिका कीर्ती शिलेदार यांच्या निधनानं मराठी संगीत रंगभूमीला समर्पित महान कलावंत काळाच्या पडद्याआड गेला आहे.वयाच्या दहाव्या वर्षी रंगभूमीवर पदार्पण केलेल्या कीर्तीताईंनी सुरेल गायन,अभिनयानं मराठी नाट्यरसिकांच्या मनावर अधिराज्य केलं.भावपूर्ण श्रद्धांजली! pic.twitter.com/oBtiIaBZco
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) January 22, 2022
सुप्रिया सुळे
त्यांच्या निधनाने कला क्षेत्राची मोठी हानी झाली आहे.
भावपूर्ण श्रद्धांजली !
— Supriya Sule (@supriya_sule) January 22, 2022
मुरलीधर मोहोळ
कलावंत म्हणून तर कीर्ती शिलेदार मोठ्या होत्याच, पण त्यांनी जपलेलं माणूसपणही भावणारं होतं.
समस्त पुणेकरांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली !#कीर्ती #शिलेदार #KirtiShiledar
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) January 22, 2022
यामिनी जाधव
मराठी संगीत रंगभूमी समृद्ध करणाऱ्या कीर्ती शिलेदार यांच्या निधनाने आणखी एक दिग्गज कलाकार काळाच्या पडद्याआड गेला. रामदास कामत यांच्या पाठोपाठ मराठी रंगभूमीला बसलेला हा दुसरा धक्का. श्रद्धांजली.#KirtiShiledar pic.twitter.com/EPt5PVLdHF
— Yamini Yashwant Jadhav (@YaminiYJadhav) January 22, 2022
अमित देशमुख
#संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायिका-अभिनेत्री #कीर्ती_शिलेदार यांच्या निधनामुळे संगीत रंगभूमीची अपरिमित हानी झाली आहे.
त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..!
आपल्या गोड गायनाने आणि प्रसन्न अभिनयाने कीर्तीताईंनी रसिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले होते.#ClassicalMusic #Culture pic.twitter.com/uEYhRLf5F9
— Amit V. Deshmukh (@AmitV_Deshmukh) January 22, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)