कर्नाटक विधानसभा निवडणूक 2023 (Karnataka Assembly Election 2023) चा निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी काँग्रेसला शुभेच्छा देत भाजपावर टिका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की "कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला तेथील जनतेने स्पष्ट जनादेश देऊन विखारी प्रचाराला निश्चित व ठाम उत्तर दिले, याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसने या निवडणुकीत अतिशय चांगली लढत दिली याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे,सोनियाजी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, डी. के. शिवकुमार जी, सिद्धरमैय्याजी यांसह कर्नाटक कॉंग्रेसचे हार्दिक अभिनंदन व नव्या सरकारला खुप खुप शुभेच्छा."
पाहा ट्विट -
कर्नाटकमध्ये कॉंग्रेसला तेथील जनतेने स्पष्ट जनादेश देऊन विखारी प्रचाराला निश्चित व ठाम उत्तर दिले, याबद्दल कर्नाटकच्या जनतेचे हार्दिक अभिनंदन. कॉंग्रेसने या निवडणुकीत अतिशय चांगली लढत दिली याबद्दल कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुनजी खर्गे,सोनियाजी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी,…
— Supriya Sule (@supriya_sule) May 13, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)