शिक्षणप्रसार आणि समाजातील सार्या वर्गातील लोकांना शिक्षणाची कवाडं खुली करण्यासाठी झटणार्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज (22 सप्टेंबर) जयंती आहे. त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन करून भरीव कामगिरी केली. आज त्यांच्या स्मृतींना अभिवादन करत एनसीपी अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी ट्वीट आपलं अभिवादन अर्पण केलं आहे.
शरद पवार
बहुजन समाजाच्या प्रगतीचे ध्येय शिक्षणाद्वारेच साध्य होऊ शकते हे ओळखून कर्मवीर अण्णांनी शिक्षण प्रसारासाठी आयुष्य वेचले. रयत शिक्षण संस्थेद्वारे तरुणांना स्वालंबनाचे धडे देत स्वतःचे कर्तृत्व घडवण्याचा आत्मविश्वास दिला. पद्मभूषण कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन. pic.twitter.com/JBJTJXjAnF
— Sharad Pawar (@PawarSpeaks) September 22, 2021
जयंत पाटील
बहुजनांच्या शिक्षणाचा वटवृक्ष कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन🙏 pic.twitter.com/sZxcAalHc5
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 22, 2021
अमोल कोल्हे
बहुजनांच्या दारात शिक्षणाची गंगा पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचलेल्या कर्मवीर भाऊराव पाटील यांची आज जयंती. समाजसुधारक व शिक्षणप्रसारक असणाऱ्या कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षणसंस्थेची स्थापना केली. तसेच मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' योजनेचा पाया घातला pic.twitter.com/u4JK9CPqGP
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 22, 2021
दिलीप वळसे पाटील
शिक्षणातून समाजाचे प्रबोधन होऊ शकते, त्यासाठी शिक्षणाचे महत्त्व तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, या विचारातून कर्मवीरांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करुन शैक्षणिक क्षेत्रात अमूलाग्र क्रांती घडवून आणली. शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन! pic.twitter.com/UndMD7FVIF
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) September 22, 2021
एकनाथ खडसे
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षि #कर्मवीर_भाऊराव_पाटील यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन ! pic.twitter.com/3nWRRrbQ9O
— Eknath Khadse (@EknathGKhadse) September 22, 2021
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)