शालेय शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार (Sexually Abusing) झाल्याची धक्कादायक घटना पुढे आली आहे. ही घटना जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील पाचारा तालुक्यात असलेल्या पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तीन मुख्य आरोपी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या चौघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. घडल्या प्रकाराची माहिती मिळताच गावातही मोठी खळबळ उडाली आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील पीडित मुलगी ही इयत्ता सातवित शिक्षण घेते. गावातील एका तरुणासोबत तिची ओळख होती. या ओळखीचा गैरफायदा घेत या तरुणाने तिला गवाबाहेर बोलावले. तिथे तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. दरम्यान, केवळ अत्याचार करुनच हा तरुण थांबला नाही. तर त्याने त्याच्या इतर मित्रांनाही घडल्या प्रकाराची माहिती देऊन बोलावले. त्यानंतर या तरुणांनीही तिच्यावर नजर ठेवायला सुरुवात केली.

दरम्यान, आरोपी तरुणाच्या मित्रांपैकी दोघांनी मुलीवर दबाव टाकून शारीरिक संबंध प्रस्तापीत केले. तुम्हा दोघांच्या संबंधांबाबत आपण गावात जाऊन सर्वांना सांगू अशी धमकीच ते त्या मुलीला देत असत. दबाव टाकून शारीरिक अत्याचार करणे हा प्रकार पाठिमागील अनेक महिन्यंपासून सुरु होता. एके दिवशी शुक्रवारी रात्री 9 वाजणेच्या सुमारास मुलगी घरातून अचानक गायब झाली. ती खूप रात्री उशीराने घरी परतली. त्यामुळे घाबरलेल्या आई-वडीलांनी विश्वासात घेऊन विचारले असात घडला प्रकार मुलीने कथन केला. (नक्की वाचा: Ghost Story of Saffron BPO in Gurgaon: कब्रस्थान वर सुरू असलेल्या बीपीओ मध्ये काम करणार्‍या Rose ची गुढकथा)

मुलीची आपबीती ऐकून तिच्या वडीलांनी थेट पोलीस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. पोलिसांनी आरोपींवर पोक्सो, अॅट्रेसिटी आणि बलात्काराच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले असून,तपास सुरुआहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)