High Court On Badlapur Sexual Assault: महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील आदर्श शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबतच्या जनहित याचिकेची, मुंबई उच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली. याबाबत आज सुनावणी पार पडली, ज्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने कडक निरिक्षण केले. न्यायालयाने म्हटले, ‘जर शाळाच मुलींसाठी सुरक्षित नसतील, तर शिक्षणाच्या अधिकारावर बोलण्यात काय फायदा?’ यासोबतच उच्च न्यायालयाने या प्रकरणाची माहिती लपवल्याप्रकरणी शाळा प्रशासनाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यास सांगितले आहे.
न्यायालयाने नमूद केले, या मुलींनी तक्रार केली, पण अनेक केसेस दाखल झाल्या नाहीत. नक्कीच पोलिसांनी आपली भूमिका जशी असायला हवी होती तशी बजावली नाही. पोलीस संवेदनशील असते तर ही घटना घडलीच नसती. पीडितेचा जबाब नोंदवण्यात दिरंगाई केल्याबद्दल न्यायालयाने बदलापूर पोलिसांना फटकारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने सरकारकडून केस डायरी आणि एफआयआरची प्रत मागवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार 27 ऑगस्ट रोजी होणार आहे. (हेही वाचा: Guidelines For Girls' Safety in Schools: शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी मार्गदर्शक तत्वे जारी, CCTV बंधनकारक; बदलापूर अत्याचार प्रकरणानंतर महाराष्ट्र सरकारला जाग)
बदलापूर आदर्श शाळा लैंगिक अत्याचार प्रकरणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाची टिपण्णी-
"If School Not Safe, No Point Of Right To Education": High Court On Thane Rape https://t.co/IOFKAtoriD pic.twitter.com/mYfUlNYzjN
— NDTV (@ndtv) August 22, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)