मराठा समाजाला आरक्षण मिळावं (Maratha Reservation) यासाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं (Hemant Dhome) ट्वीटच्या माध्यमातून हेमंतनं, ' महाराष्ट्र अशांत होता कामा नये!', असं सांगितलं आहे. रितेश देशमुख,अभिनेत्री अश्विनी महांगडे, अभिनेते किरण माने यांनी मनोज जरांगे आणि मराठा आरक्षण याबाबत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केल्या आहेत
पाहा हेमंत ढोमे यांची पोस्ट -
आजवर शांततेने, अहिंसेने चाललेले मराठा आरक्षणाचे आंदोलन हिंसक वळण घेतंय..
मनोज जरांगे पाटलांची तब्येत ढासळतेय…
त्यांच्या नाय्य मागणीचा विचार झाला पाहिजे!
सरकारने लवकरात लवकर ठोस पावलं उचलावीत!
शिवरायांचा, शाहू, फुले, आंबेडकरांचा आपला महाराष्ट्र अशांत होता कामा नये!
जय शिवराय! pic.twitter.com/uTa1OlZ9Sy
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) October 31, 2023
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)