महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आपल्या अनेक विवादित वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. विरोधकांनीही त्यांच्यावर अनेकवेळा पक्षपाती असल्याचा आरोप केला आहे. याआधी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शनिवारी एक विधान केले जे चर्चेत होते. ते म्हणाले होते की, 'राज्यपाल होण्यात आनंद नाही, या पदावर असण्याचे दु:खच आहे. आता माहिती मिळत आहे की, लवकरच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पदमुक्त होऊ शकतात. त्यांनी आज सांगितले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी, 'आपल्याला सर्व राजकीय जबाबदाऱ्यांमधून मुक्त व्हायचे आहे', असे पंतप्रधानांना कळवले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)