गुवाहाटी येथे सध्या एकनाथ शिंदे यांची बंडखोर आमदारांच्यासोबत बैठक सुरु आहे. अशात नुकतेच त्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपली भावना, मनोगत किंवा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या ट्वीटमध्ये शिंदे यांनी एकूण 4 मुद्दे मांडले आहेत. या ट्वीटमध्येही त्यांनी पुन्हा हिंदुत्वाचा उल्लेख केला आहे. ते म्हणतात-

  1. गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला आणि शिवसैनिक भरडला गेला.
  2. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे- शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे.
  3. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक.
  4. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे.

उद्धव ठाकरे यांच्या संबोधनानंतर अगदी काही वेळातच एकनाथ शिंदे यांचे हे ट्वीट आल्याने शिंदे आपल्या मतावर ठाम असल्याचे दिसत आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)